Monday, June 13, 2016

HDFC Short Term Fund

HDFC Short Term Fund - short term (DEBT) CATEGORY FUND

अल्प मुदतीसाठी योजना (Debt Schemes for Short Term) या विभागातील हि चांगली कामगिरी करणारी योजना आहे. बँकेत एक किंवा दीड वर्षासाठी एफ.डी. करावी का याला काही चांगला पर्याय आहे का असा जर तुमच्या मनात संभ्रम असेल तर, शोर्ट टर्म फंड्स हे याला उत्तर आहे. अश्या योजनेत तुम्ही केव्हाही गुंतवणूक करावी, किमान दीड ते दोन वर्षासाठी करावी, अशा योजनेतील निधीची गुंतवणूक हि १८ ते २४ महिन्यांचे मुदतीच्या कर्ज रोखे, मनी मार्केट साधने, अल्प मुदतीचे पेपर्स इ. निश्चितउत्पन्न (व्याज) देणाऱ्या गुंतवणूक साधनातच केली जाते. यामुळे अशा प्रकारचे योजनेत शेअर बाजाराचे चढ उताराची कोणतीही जोखीम नसते. अश्या प्रकारातील योजनेत दीड ते दोन वर्षे अशा कालावधीसाठी गुंतवणूक करावी.


योजनेची माहिती:
HDFC Short Term Fund हि योजना २८ फेब्रुवारी २००२ रोजी गुंतवणुकीसाठी खुली झाली.  हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे १०/०६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.२७८७/- कोटी एवढे आहे. अशा योजनेत केव्हाही एक रकमी गुंतवणूक करावी. तसेच या योजनेत एस.आय.पी. व्दारे सुद्धा गुंतवणूक करता येते. या योजनेत एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढल्यास ०.७५% एक्सझीट लोड लागतो, या मुळे एक वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी यात गुंतवणूक करावी. बँकेचे बचत खाते व अल्प मुदतीच्या एफ.डी. हा उत्तम पर्याय आहे. 

योजनेचे उदिष्ट:

वेगवेगळ्या क्षेत्रातील अल्प मुदतीच्या निश्चितउत्पन्न (व्याज) देणाऱ्या अनेक कंपन्यांचे, बँक आणि सरकारी रोखे, डिबेंचर्स मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे व ज्यांना लाभांश हवा असतो त्यांना नियमितपणे चांगला लाभांश देता यावा हा आहे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे. 

गुंतवणुकीचे पर्याय 
म्युचुअल फंडाचे सर्वच खुल्या प्रकारातील योजनेत ग्रोथ, लाभांश हे दोन प्रमुख पर्याय असतात. ग्रोथ पर्यायात गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील चढ उतारानुसार वाढत असते. लाभांश पर्यायात लाभांश पुनर्गुंतवणूक व लाभांश देय असे दोन पर्याय असतात. लाभांश पुनर्गुंतवणूक मध्ये लाभाश जाहीर झाल्यानंतर तो परत याच योजनेत गुंतवला जातो व देय लाभांश पर्यायामध्ये तो जेव्हा जाहीर होतो तेव्हा गुंतवणूकदाराला दिला जातो. या योजनेत मासिक लाभांश मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. अनिल बामबोली हे करत आहेत. त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
दिनांक १०/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.३०.११ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला (२ फेब्रुवारी २००२) एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक १०/०६/२०१६ रोजी मूल्य रु.३.०१ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. या योजनेत  मासिक लाभांश, वार्षिक लाभांश किंवा ग्रोथ असे पर्याय आहेत. या योजनेत तुम्ही एस.आय.पी. सुद्धा करू शकता व ज्या आधारे तुम्ही तुमचा आकस्मिक खर्चासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद करू शकता, एस. आय. पी. चा परतावा हा बँके च्या आर.डी. पेक्षा जास्त असु शकतो.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी ९.१४% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. आजचे तारखेला हि या विभागातील एक  चांगली योजना आहे.

या योजनेबाबत काही महत्वाची आकडेवारी : 
Basic Details
Fund House:HDFC Mutual Fund
Launch Date:Feb 28, 2002
Benchmark:Crisil Short-Term Bond
Riskometer:Moderate
Risk Grade:Below Average
Return Grade:High
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:8.02%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum Withdrawal (R)1,000
Minimum SWP Withdrawal (R)500
Minimum Balance (R)500
Exit Load (%)0.75% for redemption within 365 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund4.250.712.719.579.149.388.97
CCIL T Bill Liquidity Weight2.160.461.245.085.425.464.73
Category3.870.672.688.398.668.988.50
Rank within Category152540102483
Number of funds in category84868684763618
As on Jun 10, 2016 Source: Valueresearchonline.com

योजनेची  कामगिरी 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month5.67  (Nov 18, 2008 - Dec 18, 2008)-1.77  (Jul 15, 13 - Aug 14, 2013)
Quarter8.20  (Oct 16, 2008 - Jan 15, 2009)-2.68  (May 20, 13 - Aug 19, 2013)
Year16.25  (Apr 22, 2008 - Apr 22, 2009)3.16  (Oct 19, 03 - Oct 18, 2004)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund8.771.921.931.862.393.24
CCIL T Bill Liquidity Weight*------
Category8.351.782.353.181.862.93
Rank within Category262449662133
Number of funds in category929292929292
As on May 31, 2016
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund4.250.030.210.712.714.729.579.149.388.408.97
CCIL T Bill Liquidity Weight2.160.060.100.461.242.415.085.425.464.724.73
Category3.870.030.200.672.684.288.398.668.988.188.50
Rank within Category1513322540111024883
Number of funds in category8486868686848476362818
As on Jun 10, 2016
Source: Valueresearchonline.com


योजनेच्या गुंतवणुकीचा तपशील (पोर्टफोलिओ)

Top Holdings
CompanyInstrumentCredit Rating1Y Range% Assets
  Adani TransmissionDebentureAA+0.00 - 5.925.92
 11.2% Aditya Birla Retail 2017DebentureA-4.07 - 5.094.14
 9.23% EID-Parry (I) 2018DebentureA+0.00 - 4.383.59
 Tata Motor Finance 2018DebentureAA0.00 - 4.063.42
 9.36% Vedanta 2017Non Convertible DebentureAA-0.00 - 3.793.20
  10.81% Writers and Publishers 2018Structured ObligationAA-3.03 - 4.163.03
  8.28% Rural Electrification 2017BondsAAA0.00 - 5.172.85
 10.35% Mandava Holdings 2018BondsAAA2.66 - 3.322.70
 Adani Power 2018Structured ObligationAA-2.43 - 4.022.43
 Sadbhav Infrastructure Project 2019DebentureA+2.32 - 2.912.42
 13.45% Prime Publishing 2017Bonds/NCDsUnrated2.34 - 2.922.37
 SIDBI 90-D 21/06/2016Commercial PaperA1+0.00 - 2.632.04
 Tata Sky 2020Zero Coupon BondsA+1.87 - 2.372.01
 11.75% Cholamandalam Invest. & Fin. 2019DebentureAA1.86 - 2.321.89
  8.38% HDFC 2018Bonds/DebenturesAAA0.00 - 1.791.79
  8.25% SAIL 2018BondsAA0.00 - 1.781.78
 ITD Cementation India 350-D 23/03/2017Commercial PaperA10.00 - 1.731.65
 11.25% Simplex Infrastructures 2020DebentureA0.00 - 1.981.62
 Aarti Industries 2019DebentureA+1.45 - 1.811.49
 10.2% Raymond 2018DebentureAA-1.43 - 1.791.46
 12.65% Prism Cement 2017DebentureA-1.44 - 1.801.46
 Aarti Industries 2017DebentureA+1.43 - 1.791.45
 Prism Cement 2017DebentureA-1.41 - 1.771.44
 Silkroad Sugar Private 2017Zero Coupon BondsA+0.00 - 1.511.28
 13.3% Peninsula Land 2017DebentureA1.25 - 1.561.27
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on May 31, 2016 Source: Valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगल्या निश्चित उत्पन्न (व्याज) देणाऱ्या कर्ज रोखे, डिबेंचर्स इ. साधंत गुंतवणूक केलेली आहे. 

योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील जवळपास पत मानांकन, कर्ज रोख्याचे पैसे/व्याज वेळेत न मिळणे हि जोखीम असते. व्याजातील बदल, क्रेडीट रेटिंग, अवसानात जाणे अशी जोखीम कर्जरोखे आधारित साधनात असते, म्हणून पोर्टफोलिओ मधील बॉंडस, डिबेंचर्स वगैरे कोणत्या दर्जाचे आहेत हे तपासून पाहावे. HDFC Short Term Fund या योजनेतील निवडलेले बॉंडस, डिबेंचर्स हे ए, ए+ वगैरे उच्च पतमापन असणारे आहेत. 

या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
या योजनेत मुख्यत्वेकरून ज्यांना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल, ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे वाटत असेल, ज्यांना बँक एफ.डी. पेक्षा जास्त परतावा कमी काळात हवा असेल, ज्यांना बँक एफ.डी. मध्ये टी.डी.एस. कापला जातो तसा कापला जाऊ नये असे वाटते त्यांनी या योजनेत गुंतवणूक करावी.

या योजनेत गुंतवणूकीचे अन्य लाभ:
१) टी.डी.एस. कापला जात नाही.
२) तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली तर इंडेक्ससेशन चा लाभ मिळून कर बचत होते. अत्यंत नगण्य किंवा शून्य कर दायित्व येते.
३) कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते.
४) बँक ए.डी. ला उत्तम पर्याय.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?

जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.