Axis Long Term Equity Fund - ELSS
कलम ८०-सी अंतर्गत आयकर बचतीसाठी हि एक अतिशय उत्तम योजना आहे, हि योजना २९ डिसेंबर २००९ रोजी गुंतवणुकीसाठी सुरु झाली. सातत्याने गुंतवणुकीवर उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. या योजनेतील परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने कमी आहे. गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामध्ये विभागलेली आहे मात्र यातील सर्वात जास्त भाग हा मोठा कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतवला जात असल्याने तुलनेने जोखीम कमी होते.
योजनेची माहिती:
हि योजना ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणून ओळखली जाते. या योजनेतील गुंतवणुकीवर रु.१.५० लाख रुपयांपर्यंत आयकर कलम ८०-सी अंतर्गत उत्पन्नात सूट मिळते. अशा प्रकारचे योजनेत सर्वात कमी म्हणजे फक्त ३ वर्षांचा लॉकइन पिरियड असतो त्यामुळे ३ वर्षानंतर केव्हाही पैसे हवे असल्यास किंवा अपेक्षेप्रमाणे वाढलेले असल्यास काढता येतात. हि योजना (Diversified) विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतवणूक करणारी योजना आहे.
सर्वात चांगली सुविधा म्हणजे सतत ३ वर्षे एकरकमी अथवा एस.आय.पी. मार्फत गुंतवणूक केल्यानंतर चौथ्या वर्षा पासून यातून ते पैसे याच (Axis Mutual Fund) लिक्विड योजनेत वर्ग करण्याची व तेथून परत मूळ योजनेत (Axis Long Term Equity Fund) महिना, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक तत्वावर वर्ग करण्याची सूचना सुद्धा तुम्ही देऊ शकता जेणेकरून सलग फक्त ३ वर्षे गुंतवणूक करत राहून नंतर आयुष्यभर आयकर कलम ८०-सी अंतर्गत उत्पन्नात सूट मिळवता येऊ शकेल.
फंड मॅनेजर:
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. जीनेश गोपनी हे एप्रिल २०११ पासून करत असून म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक उत्तम फंड मॅनेजर म्हणून ओळखले जातात.
योजनेची मागील कामगिरी:
हि योजना २९ डिसेंबर २००९ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी १८.६०% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे.
Basic Details | ||
---|---|---|
Fund House: | Axis Mutual Fund | |
Launch Date: | Dec 29, 2009 | |
Benchmark: | S&P BSE 200 | |
Riskometer: | - | |
Risk Grade: | Low | |
Return Grade: | High | |
Turnover: | 23% | |
Type: | Open-ended |
Investment Details | ||
---|---|---|
Return since Launch: | 18.60% | |
Minimum Investment (R) | 500 | |
Minimum Addl Investment (R) | 500 | |
Minimum SIP Investment (R) | 500 | |
Minimum No of Cheques | 6 | |
Minimum Withdrawal (R) | 500 | |
Minimum Balance (R) | - | |
Exit Load (%) | 0 |
Performance
YTD | 1-Month | 3-Month | 1-Year | 3-Year | 5-Year | 10-Year | |
---|---|---|---|---|---|---|---|
Fund | -2.74 | -0.62 | 6.99 | -3.77 | 24.21 | 19.61 | - |
S&P BSE 200 | -2.80 | -1.91 | 8.28 | -6.89 | 9.79 | 7.74 | - |
Category | -2.49 | -1.03 | 9.61 | -3.28 | 17.15 | 12.20 | - |
Rank within Category | 40 | 20 | 72 | 39 | 4 | 1 | - |
Number of funds in category | 78 | 80 | 78 | 72 | 68 | 34 | - |
As on May 20, 2016 Source ValueResearchOnline.com
योजनेची सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सर्वात जास्त सरासरी २४.२१% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. आजचे तारखेला हि या विभागातील एक सर्वोत्तम योजना आहे.
Key Performance and Risk Statistics of Axis Long Term Equity Fund - Growth
Key Statistics | Volatility | Sharpe Ratio | Alpha | Beta | Yield to Maturity | Average Maturity |
---|---|---|---|---|---|---|
Axis Long Term Equity Fund - Growth | 14.69 | 1.54 | -0.09 | 0.73 | - | - |
Equity Linked Savings Schemes (ELSS) | 15.89 | 0.91 | - | 1.0 | - | - |
पोर्टफोलिओ:
या योजनेतील गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे.
या योजनेतील गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे.
Portfolio
Portfolio Aggregates | |||
---|---|---|---|
Fund | Benchmark | Category | |
Average Mkt Cap (Rs Cr) | 46,860.84 | 139,017.05 | 42,262.89 |
Giant (%) | 44.00 | 64.32 | 44.72 |
Large (%) | 24.09 | 22.06 | 18.96 |
Mid (%) | 30.47 | 13.23 | 28.38 |
Small (%) | 1.44 | 0.39 | 8.49 |
Tiny (%) | - | - | 0.65 |
Value Research Fund Style | |
---|---|
Top Holdings | ||||||
---|---|---|---|---|---|---|
Company | Sector | PE | 3Y High | 3Y Low | % Assets | |
HDFC Bank | Financial | 22.47 | 8.82 | 4.55 | 8.34 | |
Kotak Mahindra Bank | Financial | 37.36 | 7.61 | 5.51 | 7.61 | |
Tata Consultancy Services | Technology | 20.21 | 6.77 | 4.71 | 6.52 | |
HDFC | Financial | 18.00 | 7.05 | 4.17 | 5.99 | |
Sun Pharmaceutical Inds. | Healthcare | 48.52 | 6.70 | 3.53 | 5.35 | |
Maruti Suzuki India | Automobile | 25.15 | 5.08 | 0.96 | 5.08 | |
Pidilite Industries | Chemicals | 44.10 | 4.47 | 0.00 | 4.41 | |
Larsen & Toubro | Diversified | 24.57 | 7.82 | 1.28 | 3.41 | |
Motherson Sumi Systems | Automobile | 27.42 | 3.72 | 1.41 | 3.35 | |
TTK Prestige | Cons Durable | 52.09 | 5.13 | 2.07 | 3.15 |
Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
Indicates a new holding since last portfolio
As on Apr 30, 2016 Source ValueResearchOnline.com
योजनेचा आढावा
|
|
योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील ८०% ते १००% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी. जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी १८% ते २२% या दरम्याने) मिळालेला आहे.
या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
ज्यांना आयकर कलम ८०-सी अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीचा लाभ हवा असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी, बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात.
या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.
गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.
तुम्हाला म्युचुअल फंडात गुंतवणूक करावयाची आहे काय?
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या. यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.
वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.
पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.
आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.
No comments:
Post a Comment