Thursday, May 19, 2016

HDFC Prudence Fund - Monthly Dividend Payout Option

HDFC Prudence Fund - Monthly Dividend Payout Option:
ही योजना खासकरून ज्या व्यक्तींना नियमित दर महिना कर-मुक्त वार्षिक साधारणपणे १२% ते १४% दराने मिळावे अशी इच्छा असेल त्यांचेसाठी ही योजना म्हणजे गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे.


योजनेची माहिती: 

ही योजना समतोल (Balanced Category) प्रकारात मोडते, अशा समतोल योजनेतील पैशांची गुंतवणूक हि किमान ६०% ते जास्तीत जास्त ८५% कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात व उर्वरित पैसे १५% ते ४०% हे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात (सरकारी रोखे, कंपन्यांचे रोखे, मनी मार्केट इ.) गुंतवले जातात, या गुंतवणुकीवर निश्चित दराने व्याज मिळत असते, तसेच जेव्हा आर.बी.आय. व्याजाचे दर कमी करते तेव्हा अशा रोख्यांची किंमत वाढत जाते आणि जर व्याज वाढले तर किंमत कमी होते.  म्हणजेच या योजनेतील ६०% ते ८५% रकमेला शेअर बाजाराची जोखीम असते तर उर्वरित १५% ते ४०% रकमेला कमी जोखीम असते, कारण रोख्यांवरील व्याज हे मिळतच असते आता जोखीम राहते ती व्याजाचे दरातील बदलामुळे रोख्यांचे किंमतीत होणारा चढ उतार, हा कमी जोखीमिचा असतो.


फंड मॅनेजर: 

या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. प्रशांत जैन हे योजनेच्या सुरुवाती पासूनच करत असून म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक उत्तम फंड मॅनेजर म्हणून ओळखले जातात. HDFC Top200 Fund, HDFC Equity Fund, HDFC Prudence Fund, HDFC MIP - Long Term Fund, HDFC Infrastructure Fund ह्या योजनांचे व्यवस्थापन श्री. प्रशांत जैन हे करत असून, या सर्वच योजनेतून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.


योजनेची मागील कामगिरी:

हि योजना १ फेब्रुवारी १९९४ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी १९% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. ह्या योजनेत १९९८ पासून नियमित दर वर्षी लाभांश दिला जात आहे, ह्याचे सरासरी वार्षिक प्रमाण १३% पडलेले असून याव्यतरिक्त मुदलात भरघोस वाढ झालेली आहे. या योजनेत २५ जानेवारी २०१६ पासून दर महिना प्रती युनिट ३० पैसे या दराने लाभांश देण्याची सुरुवात झालेली आहे.  एखाद्या व्यक्तीने जर या योजनेत सुरुवातीला रु.एक लाख गुंतवले असते तर २५ एप्रिल २०१६ पर्यंत त्याला रु.६ लाखापेक्षा जास्त करमुक्त लाभांश मिळालेला असून मुद्दल जवळपास रु.२.७५ लाख एवढे झालेले आहे. म्युचुअल फंड योजनेतून मिळणारा लाभांश हा करमुक्त असतो.  जरी लाभांशाचे उत्पन्न खात्रीशीर नसले तरी मागील इतिहास पाहता जोपर्यंत या योजनेची एन.ए.व्ही. रु.१५ चे खाली येत नाही तो पर्यंत या योजनेतून लाभांश नियमितपणे मिळण्याची चांगली शक्यता असते.  सध्याची एन.ए.व्ही. रु.२७.५६ एवढी असल्याने ती रु.१५ चे खाली येण्यासाठी शेअर बाजार चा सेन्सेक्स ७००० पर्यंत जवळपास खाली यावा लागेल, हि शक्यता फारच कमी आहे.  सध्या जर कोणी या योजनेत नियमित दर महिना करमुक्त लाभांश मिळावा म्हणून गुंतवणूक केली तर सद्याचे दराने त्याला प्रती एक लाख रु.१०८८/- एवढा लाभांश दर महिना मिळू शकेल.

Basic Details
Fund House:HDFC Mutual Fund
Launch Date:Feb 01, 1994
Benchmark:Crisil Balanced Fund Aggressive
Riskometer:-
Risk Grade:High
Return Grade:Average
Turnover:33%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:19.02%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum SIP Investment (R)500
Minimum No of Cheques12
Minimum Withdrawal (R)500
Minimum Balance (R)1,000
Exit Load (%)1% for redemption within 365 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund-3.09-0.2010.50-2.3514.8411.5914.27
VR Balanced-0.17-0.377.96-3.607.867.678.29
Category0.270.307.790.7314.2311.4310.35
Rank within Category8573146431142
Number of funds in category85878577613025
As on May 18, 2016
Source: Valueresearchonline.com









योजनेची सध्याची कामगिरी:


गेले दोन वर्षापासून या योजनेतून मिळालेला परतावा हा या प्रकारातील अन्य योजनांचे तुलनेत कमी आहे, परंतु याची काळजी करण्याचे कारण नाही कारण श्री. प्रशांत जैन यांचा अनुभव व कौशल्य हि तफावत भरून काढण्यास सक्षम आहे. तसेच या योजनेचा पोर्टफोलिओ हि उत्तम आहे. या योजनेची सन २००७ मध्ये सुद्धा कामगिरी अशीच खालावली होती, मात्र पुढे ती चांगल्याप्रकारे भरून आली होती.


पोर्टफोलिओ:

या योजनेतील गुंतवणुकीचा इक्विटी पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे.
Top Equity Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
  InfosysTechnology20.348.184.385.78
  State Bank of IndiaFinancial8.886.932.355.13
 ICICI BankFinancial12.985.783.454.80
 Aarti IndustriesChemicals16.644.050.854.05
 Larsen & ToubroDiversified25.845.131.653.79
 Tata SteelMetals0.002.490.182.49
 Maruti Suzuki IndiaAutomobile25.163.480.002.36
 Bank of BarodaFinancial0.002.811.712.36
 Axis BankFinancial14.262.330.002.33
  Aurobindo PharmaHealthcare25.164.241.192.32
 Tata Motors DVRAutomobile-3.881.492.16
  BPCLEnergy8.842.440.971.70
 Birla CorporationConstruction18.691.810.671.54
 Apar IndustriesDiversified15.061.390.001.31
 KEC InternationalEngineering17.911.480.371.19
 APL Apollo TubesMetals25.561.150.001.15
 Tata MotorsAutomobile14.931.120.001.12
  Union Bank of IndiaFinancial5.620.990.250.97
 SiemensEngineering60.930.950.000.95
  Bharti AirtelCommunication25.322.510.000.93
 Grasim IndustriesDiversified16.820.920.000.92
 Sundram FastenersEngineering22.531.050.280.89
 Power Grid Corp.Energy12.900.930.000.88
  Bajaj ElectricalsCons Durable22.070.930.000.88
 Sanghvi MoversConstruction13.261.050.080.86
Source: Valueresearchonline.com


या योजनेतील गुंतवणुकीचा डेब्ट (निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांचा) पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे आहे.

Top Debt Holdings
CompanyInstrumentCredit Rating1Y Range% Assets
 8.3% GOI 2042Central Government LoanSOV0.00 - 4.613.78
 8.97% GOI 2030Central Government LoanSOV2.26 - 2.822.51
 8.32% GOI 2032Central Government LoanSOV2.21 - 2.732.47
 10.75% IDBI BankBondsA0.00 - 2.262.20
 9.23% GOI 2043Central Government LoanSOV1.73 - 1.971.78
 8.33% GOI 2036Central Government LoanSOV1.17 - 1.441.31
 8.3% GOI 2040Central Government LoanSOV1.29 - 1.431.30
 8.2% GOI 2025Central Government LoanSOV1.03 - 1.301.15
 8.17% GOI 2044Central Government LoanSOV1.10 - 1.201.10
 9.15% GOI 2024Central Government LoanSOV0.97 - 1.221.08
 11% Bank of India 2024BondsAA-0.00 - 0.980.95
  HDFC Cash Mgmt Savings DirectMutual Funds-Debt-0.00 - 0.940.94
  Tata Motor Finance 59-D 10/06/2016Commercial PaperA1+0.00 - 0.930.93
 8.33% GOI 2026Central Government LoanSOV0.75 - 0.950.84
 9.4% Sterlite Industries 2022DebentureAA-0.00 - 0.550.49
 8.83% GOI 2041Central Government LoanSOV0.31 - 0.380.34
 10.4% Punjab National BankBonds/NCDsAA+0.00 - 0.260.25
 7.95% GOI 2032GOI SecuritiesSOV0.00 - 0.310.25
 10.25% State Bank of IndoreBonds/NCDsAAA0.00 - 0.220.19
 8.28% GOI 2027Central Government LoanSOV0.13 - 0.730.13
 9.4% Sterlite Industries 2022Non Convertible DebentureAA-0.00 - 0.140.12
 10% ICICI Bank 2017BondsAAA0.09 - 0.110.10
Source: Valueresearchonline.com


वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगले शेअर्स  व बॉंडस या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत.



योजनेचा आढावा 


Asset Allocation (%)
EquityDebtCash & Cash Eq.© Value Research
Concentration & Valuation
Number of Stocks79
Top 10 Holdings (%)37.16
Top 5 Holdings (%)23.55
Top 3 Sectors (%)33.00
Portfolio P/B Ratio1.47
Portfolio P/E Ratio14.9
Source: Valueresearchonline.com


योजनेतील जोखीम:

ह्या योजनेतील ६०% ते ८५% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.  याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेय गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण मिळणारा लाभांश प्रती युनिट ३० पैसे दराने मिळत असल्याने लाभांशाची रक्कम स्थिर रहाण्याचीच शक्यता आहे. उदा. जर तुम्ही रु.१० लाखाची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिना साधारणपणे रु.१०८८८/- एवढा करमुक्त लाभांश मिळेल, काही काळाने बाजार खाली आला व एन.ए.व्ही. मध्ये घट होऊन तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.८ लाख झाले तरी तुम्हाला मिळणारा करमुक्त लाभांश रु.१०८८८/- प्रमाणेच मिळणार आहे.  अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वाढते ती कमी होणारच व ज्याची किंमत कमी होते ती वाढणारच हा नियम शेअर बाजारातील गुंतवणुकीला तंतोतत लागू पडतो.


या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:

ज्यांना नियमित दर महिना लाभांशाचे उत्पन्न हवे आहे अश्या व्यक्तीने करावी, कारण आज म्युचुअल फंड उद्योगात नियमित दर महिना एवढा लाभांश देणारी अन्य योजना नाही. निवृत्त व्यक्ती ज्यांना दर महिना मिळणारा पगाराच चेक बंद झाला आहे व ज्यांना निवृत्तीचा फायदा एक रकमी मिळालेला आहे अशनी त्याचेकडे उपलब्ध असणाऱ्या पैशापैकी ४०% ते ५०% रक्कम या योजनेत गुंतवावी व उर्वरित रक्कम कायम निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवावी. ज्यांना भविष्यात असे उत्पन्न हवे असेल किंवा ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज नसेल त्यांनी अन्य योजनेत चांगल्या सल्लागाराचे मदतीने गुंतवणूक करावी.


या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?

ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.


गुंतवणूक केल्यावर काय करावे?

गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.  खरे पाहता निवृत्तीनंतर यात केलेली गुंतवणूक आपण मरेपर्यंत याच योजनेत ठेवावी व नंतर ती वारसाला मिळावी असा विचार असावा.

तुम्हाला म्युचुअल फंडात गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  




वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

Visit us: www.mutualfundmarathi.com








No comments:

Post a Comment