Home

या ब्लॉगवर मी म्युचुअल फंडाचे काही गुंतवणुकीसाठी चांगल्या योजनांची माहिती देणार आहे, यामध्ये योजनेचे गुंतवणुकीचे उदिष्ठ काय आहे, कोणत्या प्रकारचे कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते, योजनेचे स्वरूप, मागील कामगिरी इ. माहिती दिलेली आहे.  हि माहिती देताना योजनेची मागील कामगिरी दाखवण्यासाठी  www.valueresearchonline.com या संकेतस्थळावरील माहितीचा मी आधार घेतलेला आहे. म्हणून त्यांना धन्यवाद. 

येथे मी जमल्यास रोज एका योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, आठवड्यात किमान ३ योजनांची तरी माहीती देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. 

लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, कर बचतीच्या, बॅलन्सड, क्षेत्रीय इ. सर्व प्रकारचं समभाग आधारित योजनांची माहिती मी प्रथम देणार असून नंतर कर्ज रोखे आधारित योजनांची माहिती देण्याचा माझा येथे प्रयत्न असेल.

नियमितपणे येथे भेट देत राहा. जर तुम्हाला हि माहिती उपयुक्त वाटली तर तुम्ही हि Facebook, Google+ आणि Twitter या संकेतस्थळावर शेअर करा. 

आपण जर आमचे मार्फत गुंतवणूक केली तर तुम्हाला खालीलप्रमाणे फायदे मिळतील:
  • २४/७ केव्हाही तुमच्या गुंतवणुकीचा तपशील पाहण्यासाठी लॉगीन आयडी व पासवर्ड दिला जाईल (www.shthakur.com) या संकेतस्थळावर हि सुविधा दिलेली आहे.
  • (www.shthakur.com) या संकेतस्थळावर तुमचे आर्थिक नियोजन करण्याची मोफत सुविधा दिलेली आहे.
  • आम्ही NSE व  MF Utility या दोन्ही प्लॅटफॉर्म सोबत सलग्न झालेलो आहोत येथे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी आम्ही तुम्हाला एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगीन सुविधा देऊ, याचा वापर करून तुम्ही नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे किंवा चालू एस.आय.पी. बंद करणे, बँक खाते बदल, पत्ता बदल करणे, नॉमिनी बदली करणे आदी सर्व गोष्टी करू शकाल. तसेच यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही मला फोनवर करण्याची सूचना देऊ शकता. थोडक्यात पेपरलेस सुविधा तुम्हाला मिळेल.
  • मी तुम्हाला तुमच्या जोखीम स्वीकारण्याच्या तयारीनुसार व किती काळासाठी गुंतवणूक करणार आहात, तुमचे उत्पन्न, वय, अवलंबून असणारी माणसे, नियमित किती बचत करू शकता आदी बाबी विचारात घेऊन व तुमच्याशी फोनवर चर्चा करून अथवा प्रत्यक्ष भेटीत योग्य योजना निवडण्यास मदत करीन.
  • तुम्हाला म्युचुअल फंडाबाबत तपशीलवार माहिती वाचवायची असल्यास आमच्या मराठी संकेतस्थळावर ती तुम्ही वाचू शकता.
तुम्हाला म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.




वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

No comments:

Post a Comment