Friday, June 3, 2016

Sundaram Select Midcap Fund

Sundaram Select Midcap Fund - MID CAP CATEGORY FUND 

मिड कॅप विभागातील हि एक चांगली कामगिरी करणारी योजना आहे.  हि योजना ३० जुलै २००२ रोजी गुंतवणुकीसाठी सुरु झाली, एक सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारी योजना आहे. सातत्याने गुंतवणुकीवर उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. गेल्या १४ वर्षात मिळालेला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर २९.३३% एवढा आहे. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने जास्त आहे, कारण कोणत्याही मिड कॅप योजनेत जास्त जोखीम असते.  अशा योजनेत गुंतवणूक करताना ती दीर्घ मुदतीसाठीच असली पाहिजे. तरुण व्यक्ती ज्यांनी नुकतीच करिअर सुरु केली आहे त्यांनी मात्र अशा योजनेत त्यांचे गुंतवणुकीचे किमान ४०% रक्कम अवश्य गुंतवणूक केली पाहिजे, व गुंतवणुकीचा कालावधी किमान १० वर्षांपेक्षा जास्त असेल तर फार चांगले. अल्प मुदतीसाठी अशा योजनेत गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे होऊ शकते. गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामधील फक्त मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मध्येच केली जाते. या योजनेत दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे.


योजनेची माहिती:
हि योजना मिड कॅप प्रकारात मोडते. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे २/६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.३४४० कोटी एवढे आहे. सध्या अनेक मिड कॅप कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा २५% ते ७५% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम चांगल्या मिड कॅप कंपन्यांचे शेअर्सचे भावाला लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी. 


योजनेचे उदिष्ट:

वेगवेगळ्या क्षेत्रातील माध्यम आकाराचे अनेक कंपन्यांचे (Mid Cap) शेअर्स मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. एस. कृष्णकुमार हे नोव्हेंबर २०१२ पासून करत असून त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा १६ वर्षांचा अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
हि योजना ३० जुलै २००२ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी २९.३३% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. दिनांक ०२/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.३५२.६५ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक २/०६/२०१६ रोजी मूल्य रु.३५.२६ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.१००००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.१६.७० लाख एवढी करून झालेली असून दिनांक ०२/०६/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.१ कोटी १२ लाख ५७ हजार एवढे झालेले आहे (फक्त १४ वर्षात).
Basic Details
Fund House:Sundaram Mutual Fund
Launch Date:Jul 30, 2002
Benchmark:S&P BSE Mid Cap
Riskometer:Moderately High
Risk Grade:Above Average
Return Grade:Above Average
Turnover:15%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:29.33%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)500
Minimum SIP Investment (R)250
Minimum No of Cheques-
Minimum Withdrawal (R)500
Minimum Balance (R)1,000
Exit Load (%)1% for redemption within 365 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund0.862.7715.526.9530.0218.5916.18
S&P BSE Mid Cap2.372.1713.488.9021.2510.508.87
Category-0.662.5412.333.0926.0016.7713.97
Rank within Category223282014142
Number of funds in category81818179653218
As on Jun 02, 2016 Source Valueresearchonline.com 


योजनेचा आढावा 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month52.92  (May 06, 09 - Jun 05, 09)-30.86  (Sep 24, 08 - Oct 24, 08)
Quarter115.35  (Mar 05, 09 - Jun 04, 09)-40.43  (Sep 02, 08 - Dec 02, 08)
Year176.54  (Mar 09, 09 - Mar 09, 10)-60.23  (Jan 14, 08 - Jan 13, 09)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund28.3920.171.161.911.1016.23
S&P BSE Mid Cap21.0518.890.851.36--
Category24.8518.881.051.711.0513.03
Rank within Category131922212915
Number of funds in category727272727272
As on May 31, 2016 Source Valueresearchonline.com 

Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund0.860.871.832.7715.521.606.9530.0218.5919.2616.18
S&P BSE Mid Cap2.370.661.932.1713.482.798.9021.2510.5011.728.87
Category-0.660.531.862.5412.33-0.113.0926.0016.7718.2713.97
Rank within Category2294832824201414142
Number of funds in category8181818181797965322818
As on Jun 02, 2016 Source Valueresearchonline.com 

Concentration & Valuation
Number of Stocks61
Top 10 Stocks (%)33.03
Top 5 Stocks (%)18.91
Top 3 Sectors (%)41.37
Portfolio P/B Ratio2.66
Portfolio P/E Ratio21.67
Portfolio Aggregates
FundBenchmarkCategory
Average Mkt Cap (Rs Cr)8,529.908,468.9413,498.84
Giant (%)--15.23
Large (%)19.572.9519.75
Mid (%)69.6179.2249.28
Small (%)10.8217.7517.11
Tiny (%)-0.070.62
Value Research Fund Style












Top Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
 FAG Bearings IndiaEngineering33.157.134.674.72
  SRFTextiles17.046.731.634.51
 Ashok LeylandAutomobile28.273.540.003.31
 UPLChemicals20.003.912.023.28
 Wabco IndiaAutomobile53.274.942.713.09
 Indraprastha GasServices18.894.392.473.04
  Bajaj FinanceFinancial33.284.322.982.98
  The Ramco CementsConstruction21.362.881.432.88
 Sundaram-ClaytonAutomobile16.783.030.672.63
 Mahindra CIE AutomotiveMetals138.184.080.002.59
 Honeywell AutomationEngineering57.453.040.742.51
 ArvindTextiles21.793.060.002.45
 Tamil Nadu NewsprintFMCG7.742.710.002.34
 Bajaj FinservFinancial15.852.551.542.32
 Yes BankFinancial17.462.270.002.27
 Timken IndiaEngineering41.883.070.002.17
 Karur Vysya BankFinancial9.863.531.862.04
 HSILConstruction21.913.221.131.80
 Vardhman TextilesTextiles9.351.800.001.64
 Jyothy LaboratoriesFMCG33.533.571.341.62
 Castrol IndiaEnergy29.281.890.001.62
 EID-Parry (I)Diversified305.472.330.981.60
 Cholamandalam Invest. & Fin.Financial27.751.540.481.54
 Glaxo Consumer HealthcareFMCG35.071.510.001.41
 DCB BankFinancial13.652.661.211.40
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on Apr 30, 2016 Source Valueresearchonline.com 

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगले  मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स  या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत, मात्र कदाचित यातील बऱ्याच कंपन्या बाबत तुम्हाला काहीच माहिती असणार नाही, अशा चांगल्या कंपन्यांची निवड करणे हेच तर निधी व्यवस्थापकाचे कौशल्य असते.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी ३०.०२% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे, मात्र याच काळात BSE S&P Mid Cap परतावा २१.२५% होता. आजचे तारखेला हि या विभागातील एक चांगली योजना आहे.
योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील ८०% ते १००% रक्कम हि शेअर बाजारात, त्यातही मिड कॅप शेअर्स मध्ये  गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील मिड कॅप शेअर्स मधील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.  याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी २५% ते ३५% या दरम्याने) मिळालेला आहे. अशा योजनेतून काही वेळा सलग ३ वर्षात ४०% ते ४५% पेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो मात्र अश्या प्रकारे जेव्हा तो मिळतो तेव्हा गुंतवणुकीतील पैसे काढून सुरक्षित करणे इष्ट होते, कारण जेव्हा इतका परतावा मिळतो तेव्हा समजावे कि नजीकचे काळात बाजार खाली येणार आहे, मात्र असे काढलेले पैसे बाजूला शक्यतो लिक्विड फंडात ठेवावेत व मार्केट परत २०% ने (मिड कॅप) खाली आले कि परत गुंतवणूक करावी.
या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
ज्यांना आपल्या समजून उमजून थोडी जास्त जोखम पत्करून जास्त लाभ मिळावा व गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा दीर्घ कालीन जसे कि निवृत्तीपश्चात जीवनासाठी आर्थिक तरतूद करावयाची असेल, भविष्यातील मुलांची शिक्षण, लग्न कार्य इत्यादी कारणासाठी चांगला फंड तयार करावयाचा असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी, बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात. मात्र प्रथमच म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सुरुवात मिड कॅप योजनेने करू नये. 
या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.
गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment