Invest Now

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल तर खालील सूचनांचे पालन करा:

जर तुम्ही म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर:

जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  

यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचारा.

एकदा नोंदणी करून झाली कि आपण नेट बँकिंग किंवा एन.इ.एफ.टी. अथवा पेइझी सुविधेचा चा वापर करूनहि गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही मला फोन करून, मेसेज किंवा इमेल करून आपली गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त कराल. आम्ही आपले वतीने एम.एफ. युटीलिटी कडे (हि संस्था अम्फी व सर्व म्युचुअल फंड कंपन्यांनी मिळून म्युचुअल फंडात सारे व्यवहार सुलभपणे व ऑनलाईन करण्यासाठी सुरु केलेली आहे) तुमची ऑर्डर  सबमिट करू, यानंतर तुम्हाला एम.एफ. युटीलिटी  तुम्हाला एस.एम.एस. व इमेल ने या ऑर्डर बाबत कळवेल, त्यामध्ये एक लिंक दिलेली असेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमची (गुंतवणूक करण्याची किंवा पैसे काढण्याची) संमती २४ तासाचे आत द्यावी लागेल. या नंतरच गुंतवणूक किंवा पैसे काढण्याचा व्यवहार पूर्ण होईल. तुमच्या परवानगी शिवाय कोणताही व्यवहार होणार नाही. पैसे काढल्यावर ते फक्त तुमच्या खात्यातच जमा केले जातील, अन्य कोणत्याही खात्यात जमा होणार नाहीत.

जर तुम्ही या पूर्वी म्युचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल व जर का तुमची के.वाय.सी. रजिस्टर व मोडीफाईड झालेली असेल तर:

खालील फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. 

यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचारा.

एकदा नोंदणी करून झाली कि आपण नेट बँकिंग किंवा एन.इ.एफ.टी. अथवा पेइझी सुविधेचा चा वापर करूनहि गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही मला फोन करून, मेसेज किंवा इमेल करून आपली गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त कराल. आम्ही आपले वतीने एम.एफ. युटीलिटी कडे (हि संस्था अम्फी व सर्व म्युचुअल फंड कंपन्यांनी मिळून म्युचुअल फंडात सारे व्यवहार सुलभपणे व ऑनलाईन करण्यासाठी सुरु केलेली आहे) तुमची ऑर्डर  सबमिट करू, यानंतर तुम्हाला एम.एफ. युटीलिटी  तुम्हाला एस.एम.एस. व इमेल ने या ऑर्डर बाबत कळवेल, त्यामध्ये एक लिंक दिलेली असेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमची (गुंतवणूक करण्याची किंवा पैसे काढण्याची) संमती २४ तासाचे आत द्यावी लागेल. या नंतरच गुंतवणूक किंवा पैसे काढण्याचा व्यवहार पूर्ण होईल. तुमच्या परवानगी शिवाय कोणताही व्यवहार होणार नाही. पैसे काढल्यावर ते फक्त तुमच्या खात्यातच जमा केले जातील, अन्य कोणत्याही खात्यात जमा होणार नाहीत.

वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

एम.एफ. युटीलिटी सोबत का नोंदणी करावी?
१) एम.एफ. युटीलिटी हा प्लॅटफॉर्म असोशिएशन ऑफ म्युचुअल फंड्स ऑफ इंडिया, नियंत्रक संस्था व म्युचुअल फंडाच्या सर्व कंपन्या (ए.एम.सी.) यांनी मिळून गुंतवणूकदाराना व म्युचुअल फंड वितरकांना  सर्व व्यवहार ऑनलाईन सुलभपणे, कोणत्याही कागदपत्रांशिवाय करता यावेत म्हणून सुरु केलेला आहे.
२) एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक सर्व म्युचुअल फंडांसाठी एक कॉमन अकाउंट नंबर मिळतो, ज्यामुळे सर्व गुंतवणुकीचे मिळून एकच अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला मिळते.  जास्त कागदपत्रे सांभाळावी लागत नाहीत. या खाते क्रमांकाचा वापर करून तुम्ही नवीन गुंतवणूक, नवीन एस.आय.पी., पैसे काढणे, गुंतवणूक एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे  आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन करू शकल.
३) जर तुम्हाला कोणताही व्यवहार करावयाचा असेल तर तुम्ही फक्त आमचे ऑफिसमध्ये एक फोन करा, किंवा SMS करा किंवा इमेल करा व आम्हाल सांगा कि तुम्हाला नवीन गुंतवणूक, एस.आय.पी., गुंतवणूक एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे इ. जो काही व्यवहार करावयाचा असेल तो सांगा, आम्ही तुमच्या वतीने एमएफ युटीलिटी वर ऑर्डर सबमिट करू, यानंतर तुम्हाला एम.एफ. युटीलिटी कडून एक मेसेज व इमेल येईल यामध्ये एक लिंक दिलेली असेल तिच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची समती २४ तासाचे आत द्यावयाची आहे, लगेच तुमचा व्यवहार पूर्ण होईल.
४) जर तुमचा बँक मँडेट नोंद झालेला असेल तर त्याव्दारे तुम्ही व्यवहार करू शकता, परंतु जर तो तसा झालेला नसेल तर तुम्ही नेट बँकिंग किंवा एन.इ.एफ.टी. (NEFT) चा वापर करूनही व्यवहार करू शकता.

आमच्या कडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:
१) आम्ही तुम्हाला www.shthakur.com या संकेत स्थळावर लॉगीन सुविधा देतो ज्याचा वापर करून तुम्ही केव्हाही तुमच्या गुंतवणुकीचा पूर्ण तपशील एकाच ठिकाणी पाहू शकता, लवकरच आम्ही सर्वच व्यवहार येथे ऑनलाईन करण्याची सुविधा सुरु करत आहोत.
२) तुम्ही आमचे Mobile App डाउनलोड करू शकता व त्याचा वापर करून केव्हाही २४/७ तुमच्या गुंतवणुकीचा तपशील पाहू शकता.
३) आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी सुयोग्य योजना निवडण्यासाठी मदत करतो.
४) तुम्ही केलेल्या गुंतवणुकीबाबत काही बदल करणे आवश्यक असेल तर आम्ही तुम्हाला तसे करण्यास मदत करतो.
५) तुमची इच्छा असल्यास आम्ही तुम्हाला आमच्या गुंतवणूकदारांसाठी असलेल्या Whatsapp group मध्ये सामील करून घेतो, येथे आम्ही नियमितपणे म्युचुअल फंड व शेअर बाजाराबाबत अपडेट देत असतो.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment